विश्वास नांगरे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई । मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (२८ सप्टेंबर) भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांची काही वेळ चर्चा झाली. नांगरे पाटील यांनी शरद पवार यांची नेमकी भेट का घेतली याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली होती. सलग दुसऱ्या दिवशीच्या या ‘भेटसत्रा’मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र दोन्ही बैठकांमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

You might also like