iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स

iQOO 9T
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध हँडसेट (iQOO 9T) निर्माता कंपनी iQOO आपला नवा स्मार्टफोन iQOO 9T लवकरच लॉन्च करणार आहे. अनेक वेगवेगळ्या फीचर्स सह हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया iQOO 9T चे फीचर्स आणि किंमत…

6.78-इंचाचा डिस्प्ले-

iQOO 9T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट 6.78-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे. हा मोबाईल फोन Android 12 OS वर आधारित आहे. या स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. तसेच या मोबाईल मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, एलटीई, ब्लूटूथ 5.3 आणि ड्युअल-बँड वाय-फाय ची सुविधा आहे. iQOO च्या या मोबाईलचे वजन 205-ग्रॅम आहे.

iQOO 9T

 

50MP चा कॅमेरा- (iQOO 9T)

कॅमेराबाबत बोलायचं झालं तर या स्मार्टफोन (iQOO 9T) ला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP अल्ट्रावाइड आणि 12MP पोर्ट्रेट कॅमेरा तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

iQOO 9T

4700mAh ची बॅटरी-

या स्मार्टफोनला (iQOO 9T) 4700mAh ची बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जला सपोर्ट करू शकेल. तसेच मोबाईलच्या स्टोरेज बाबत बोलायचं झालं तर हा नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: 8GB/128GB आणि 12GB/128GB

किंमत-

या स्मार्टफोनची किंमत त्यांच्या स्टोरेज नुसार अवलंबून आहे. त्यातील 8GB/128GB किंमत 49,999 रुपये आहे तर 12GB/128GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 54,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अल्फा आणि लीजेंड या २ कलर मध्ये मिळू शकतो.

हे पण वाचा : 

Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही

Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Google Pixel 6a : भारतात लॉंच झाला गुगल Pixel 6a; किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घ्या

iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार