हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांबचा प्रवास करण्यासाठी आजही अनेक लोकं रेल्वेची निवड करतात. प्रवाश्यांची गरज लक्षात घेऊन रेल्वेकडून देशभरात दररोज हजारो गाड्या चालवल्या जातात. मात्र जरा विचार करा कि आपण प्रवास करत असलेल्या रेल्वेला जर उशीर झाला तर प्रवाश्यांचे किती हाल होतील. असे प्रत्येक प्रवाशासोबत कधी ना कधी घडतेच. मात्र याची माहिती फार कमी लोकांकडे असेल कि जर आपल्या रेल्वेला उशीर झाला तर रेल्वेकडून काही सेवा आपल्याला फ्री मध्ये दिल्या जातात.
IRCTC च्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या ट्रेनला उशीर होणार असेल तेव्हा एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवाशांना खाण्यापिण्याची संपूर्ण सुविधा दिली जाते. याची माहिती फार कमी प्रवाशांना असली. हे लक्षात घ्या कि, रेल्वेच्या नियमांमध्ये प्रवाशांना काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जर आपली ट्रेन रेल्वेच्या कालावधीपेक्षा जास्त उशीर होणार असेल तर त्याचा फायदा मिळेल.
या गाड्यांमधील प्रवाशांना मिळते सुविधा
रेल्वेच्या नियमांनुसार, फक्त एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांनाच फ्री मध्ये खाण्यापिण्याची सुविधा मिळणार आहे. शताब्दी, दुरांतो आणि राजधानी या गाड्यांच्या प्रवाशांसाठी ते जास्त फायदेशीर ठरू शकते. या एक्स्प्रेस ट्रेन दोन तास किंवा त्याहून जास्त उशीर झाल्यास, IRCTC प्रवाशांना फ्री मध्ये जेवण पुरवते.
रेल्वेच्या कॅटरिंग पॉलिसीनुसार, ट्रेनला 2 तास किंवा त्याहून जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते. अशा परिस्थितीत, बहुतेक एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाला की प्रवाशांना जेवण आणि कोल्ड ड्रिंक्स किंवा कॉफी-चहा दिली जाते. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ जरूर घ्यावा, कारण ही सुविधा रेल्वेकडून पूर्णपणे मोफत दिली जाते.
प्रत्येक वेळी वेगळा नाश्ता
जर आपल्या ट्रेनला उशीर झाल्यास IRCTC कडून दिवसाच्या मेनूनुसार जेवण दिले जाईल. यावेळी प्रवाशांना वेळेवर जेवण देण्याची व्यवस्था रेल्वेने केली आहे. प्रवाशांना चहा किंवा कॉफी आणि नाश्त्यासाठी दोन बिस्किटे, संध्याकाळच्या नाश्तामध्ये चहा किंवा कॉफी आणि बटरसह चार ब्रेड स्लाइस दिले जातात. याशिवाय दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे दोन प्रकार दिले जातात. प्रवाशांना वरण-भात आणि लोणचे किंवा पुरी, मिक्स-व्हेज भाज्या आणि लोणचे दिले जाईल. यासोबत मीठ आणि मिरचीची पाकिटेही वेगळी दिली जातात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!
गेल्या 23 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर तपासा
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालवधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिला मोठा रिटर्न !!!
HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा