IRCTC Tour Package । भारतात अंदमान निकोबार या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात सुंदर नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. दुरून दिसणारे निळे पाणी आणि त्याच्या बाजूने पसरलेली पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर आपल्याला भूल पाडून जाते. कित्येक जोडपी या ठिकाणी हनिमूनसाठी जात असतात. परंतु मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाण्यासाठी देखील अंदमान निकोबार सर्वात सुंदर जागा आहे. सध्या पावसाळा सुरु असून मान्सूनच्या या दिवसात तुम्ही सुद्धा अंदमान निकोबारला भेट देणार असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी एक परवडणारे टूर पॅकेज आणले आहे.
कोणकोणत्या ठिकाणी जायला मिळणार? IRCTC Tour Package
IRCTC ने या टूर पॅकेज ची माहिती ट्विट करून दिली आहे. ज्यामध्ये तुम्हाला अंदमान या ठिकाणी फिरायला जायचे असेल तर तुम्ही या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता असे सांगितले आहे. तसेच बुकिंगची माहिती, टूरची तारीख, इतर सोयी सुविधा अशी सर्व माहिती IRCTC ने दिली आहे. आज आपण याच टूरच्या पॅकेजची माहिती जाणून घेणार आहोत.
IRCTC च्या या पॅकेजचे नाव स्पेशल अमेझिंग अंदमान पूर्व भुवनेश्वर असे (IRCTC Tour Package) आहे. पॅकेज कालावधी ६ रात्री आणि ७ दिवसांचा आहे. टूरचा प्रवास देखील फ्लाइटने होणार आहे. ही टूर अंदमान येथील हॅवलॉक, पोर्ट ब्लेअर याठिकाणी जाणार आहे. येत्या १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी टूर निघणार आहे. या टूरमध्ये सर्व सोयी सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येतील.
https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=SCBA49
किती खर्च आहे ?
IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, राहण्यासाठी हॉटेलची सोय, जेवणाची सोय, तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा या सर्व गोष्टी पॅकेजमध्ये मिळणार आहेत. तसेच या दूरच्या पॅकेजचा खर्च पर पर्सन ८५,५४० रुपये असणार आहे. जर तुम्ही दोन व्यक्ती जाणार असेल तर तुम्हाला प्रति व्यक्ती ६९,१०० रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर जर, तीन लोकांना प्रति व्यक्ती 67,530 रुपये शुल्क भरावे लागतील. पॅकेजनुसार, तुम्हाला लहान मुलांसाठी वेगळी फी भरावी लागणार आहे. ५-१० वर्षे मुलांसाठी ६०,६९५ रूपये बेडसह आणि रु. ५७,२३० रूपये बेडशिवाय भरावे लागणार आहेत. या पॅकेजमध्ये तुम्हाला इतर कोणताच खर्च करावा लागणार नाही. IRCTC कडून तुम्हाला सर्व गोष्टी पुरवण्यात येतील. त्यामुळे जर तुम्हाला अंदमान निकोबार येथे फिरायला जायचे असेल तर या पॅकेजचा (IRCTC Tour Package) नक्की विचार करा. याबाबत अधिक माहिती IRCTC ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.