हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा ‘आयर्नमॅन’ फेम रॉबर्ट डाऊनी ज्युनियर याचा नुकताच रॉबर्टचा ५५वा वाढदिवस झाला.दरवर्षीप्रमाणे चाहत्यांनी यावर्षीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र कोरोना व्हायरसमुळे यंदाचा वाढदिवस रॉबर्टसाठी आनंददायक नव्हता. रॉबर्टचे लाखो चाहते आज कोरोनाने बाधित होऊन मृत्यूशी लढत आहेत. त्यामुळे ‘आयर्नमॅन’ आपल्या वाढदिवशीसुद्धा आनंदी नव्हता.
रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्या देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. मात्र या पोस्टमध्ये त्याने एक दुःखद बातमी देखील दिली. कोरोनामुळे त्याच्या एका जवळच्या मित्राचं नुकतेच निधन झालं आहे.“माझ्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. परंतु या वाढदिवशी मी आनंदी नाही. कारण मागच्याच आठवड्यात माझा खूप जवळचा एक मित्र कोरोनामुळे मी गमवला आहे.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहून त्याने सर्वांना कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. आरडीजेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जगभरातील लाखो चाहत्यांनी देखील याबाबत आपले दु:ख व्यक्त केलं आहे. अनेकांनी त्याच्या मित्राला श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार