हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gratuity : कोणत्याही क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या नागरिकाला ठराविक कालावधीनंतर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. कामगार कायद्यानुसार, जर एखादा कर्मचारी साडेचार वर्षांपेक्षा जास्त काळ एका कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटी म्हणून काही रक्कम दिली जाते. मात्र, ही रक्कम कर्मचाऱ्याने नोकरीमध्ये किती काळापासून आहे यावर अवलंबून असेल.
इथे हे लक्षात घ्या कि, Gratuity ही कंपनी किंवा नियोक्त्याकडून दिली जाणारी अशी रक्कम असते, जी नोकरी दरम्यान कर्मचार्यांच्या खात्यातून थोडी थोडी कापली जाते. अशा प्रकारे ग्रॅच्युइटी म्हणून दिले जाणारे पैसे हा एक प्रकारे आपल्या कमाईचाच काही भाग असतो. अशा स्थितीत या पैशावर कर्मचार्यांना इतर मिळकतीप्रमाणेच टॅक्स भरावा लागतो का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेउयात…
इन्व्हेस्टमेंट अँड टॅक्स एक्सपर्ट असलेले मनोज जैन सांगतात की,” Gratuity हा कर्मचार्यांच्या पगाराचाच एक भाग असतो. जो कंपनीकडून थोडा थोडा करून कापला जातो आणि ठराविक काळानंतर जेव्हा कर्मचारी राजीनामा देतो किंवा रिटायर होतो तेव्हा ही रक्कम दिली जाते. हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स नियमांच्या अंतर्गत यावर टॅक्स सूट देण्याची तरतूद देखील आहे. मात्र यासाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स सवलतीच्या मर्यादेत मोठी
तफावत आहे.
सरकारी कर्मचार्यांना किती टॅक्स सूट मिळेल ???
मनोज जैन यांचे म्हणणे आहे की,”याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना Gratuity म्हणून मिळणारी 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम टॅक्स फ्री होती, मात्र 2018 मध्ये सरकारकडून याविषयीच्या कायद्यात बदल करून एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. ज्याअंतर्गत आता सरकारी कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युईटीवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांना किती टॅक्स सूट मिळेल ???
जैन यांच्या म्हणण्यानुसार, खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी Gratuity वरील टॅक्स सवलतीची रक्कम सध्या 10 लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे. तसेच या कर्मचार्यांना 10 लाख रुपयांपेक्षा जास्त ग्रॅच्युइटी म्हणून मिळालेल्या रकमेवर त्यांच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल. मात्र, खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांना ग्रॅच्युइटीवर आणखी टॅक्स सूट देण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. ज्यामुळे भविष्यात त्यांना 20 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर टॅक्स सूट मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता