नवी दिल्ली । जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे PF खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. वास्तविक, नोकरी करणाऱ्यांना पुढील महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. पुढील महिन्यात रिटायरमेंट फंड बॉडी असलेली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची (CBT) बैठक होणार आहे. या बैठकीत 2021-22 साठी PF डिपॉझिट्सवर उपलब्ध असलेल्या व्याजदराबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
2021-22 साठी देखील ते 2020-21 प्रमाणेच 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवेल, केंद्रीय कामगार मंत्री आणि CBT प्रमुख भूपेंद्र यादव म्हणाले की,”पुढील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारावर हा निर्णय घेतला जाईल.”
पगारदार लोकांसाठी, PF ची रक्कम ही त्यांच्या आयुष्यभराची कमाई असते. अशा परिस्थितीत PF शी संबंधित नियमांची माहिती घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. PF खाते कधी निष्क्रिय किंवा इनएक्टिव्ह होते आणि अशा इनएक्टिव्ह खात्यावर व्याज मिळते का हे जाणून घेउयात.
PF खाते कधी इनएक्टिव्ह होते ?
>> नोकरी बदलल्यावर जुने PF खाते नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करावे. तुमच्या PF खात्यातून 36 महिन्यांपर्यंत कोणतेही ट्रान्सझॅक्शन न झाल्यास खाते बंद केले जाईल. EPFO अशा खात्यांना ‘इनऑपरेटिव्ह’ कॅटेगिरीमध्ये ठेवते.
>> PF खातेधारक कायमस्वरूपी परदेशात स्थायिक झाले असतील तर खाते बंद केले जाईल.
>> PF खातेधारकांचा मृत्यू झाल्यास खाते इनएक्टिव्ह होते.
>> याशिवाय, EPFO सदस्याने सर्व रिटायरमेंट फंड काढला असला तरी खाते इनएक्टिव्ह होते.
>> सात वर्षांपर्यंत कोणीही PF खात्यावर क्लेम केला नाही तर हा फंड Senior Citizens’ Welfare Fund मध्ये टाकला जातो.
इनएक्टिव्ह खात्यात जमा केलेल्या पैशांचे काय होते?
आता खाते इनएक्टिव्ह असूनही खात्यात असलेल्या पैशांवर व्याज जमा होते. यापूर्वी इनएक्टिव्ह PF खात्यावर व्याज मिळत नव्हते. मात्र, 2016 मध्ये नियमात सुधारणा करून व्याज सुरू करण्यात आले. तुमच्या वयाची 58 वर्षे पूर्ण होईपर्यंत तुमच्या PF खात्यावर व्याज जमा होत राहते.