नवी दिल्ली । केंद्र सरकारने लहान उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सरकार फक्त 2% व्याजासह 5 लाखांपर्यंतचे कर्ज देत आहे. चला तर मग या मेसेजमागील सत्य जाणून घेऊयात …
व्हायरल मेसेजचे सत्य असे आहे
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार मुद्रा योजनेअंतर्गत कमी व्याजदराने कर्ज देत आहे. या मेसेजमध्ये एक नंबर देखील शेअर केला गेला आहे ज्यावर कर्जासाठी कॉल करावा.
सरकारने हा मेसेज बनावट असल्याचे सांगितले
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून या बातमीची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने आपल्या ट्विटरवरून इशारा दिला आहे की,” सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही आणि हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे.”
चला जाणून घेऊयात कि, पीएम मुद्रा योजना काय आहे ?
मुद्रा योजनेअंतर्गत गॅरेंटीशिवाय कर्ज उपलब्ध होते. याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेतील कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येईल. योजने अंतर्गत कोणतेही निश्चित व्याज दर नाहीत. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याज दर 12%आहे.
या योजनेमध्ये 3 प्रकारच्या कर्जाचा समावेश आहे
1. शिशु लोन: शिशु लोन अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे लोन दिले जाते.
2. किशोर लोन: किशोर लोन अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे लोन दिले जाते.
3. तरुण लोन: तरुण लोन अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन दिले जाते.