हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोना या महामारीच्या संकटामुळे अनके ठिकाणी लॉक डाउनचा पर्याय वापरला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम थेट लोकांच्या रोजगारावर झाला आहे. अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी पगार कपात केला जात आहे. या साऱ्या घडामोडींवर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कठीण काळात आपल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी हि त्या त्या कंपनीवर असते. अनेक कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची ती जबाबदारी घ्यायची असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्यांशी चुकीच्या पद्धतीने असे वागू शकत नाही . कर्मचाऱ्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवाल करून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
उद्योजक आणि कंपन्यांसाठी दीर्घकाळ काम करणे. हे जसे कर्मचाऱ्यांची नैतिकता असते . त्याच पद्धतीने कंपनीची पण नैतिकता आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळायची असते.ही तेच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे. या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, साथीच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचार्यांशी असे वागता, ही तुमची संवेदनशीलता आहे का? असा सवाल त्यांनी युवरस्टोरीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
रतन टाटा म्हणाले की, जेव्हा देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला, आणि हजारोच्या संख्येने लोक मारले जाऊ लागले. त्याच वेळी अनेक राज्यांनी लॉक डाउन घोषित केला. सर्व कामकाज बंद झालं तेव्हा आपोआप कंपन्यांना हि ताळे लागले. त्याच सुमारास हजारो लोकांना काढून टाकण्यात आले. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल का? असे मला वाटत नाही. कारण तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले आहे, अशात लोकांना नोकरीवरून काढणे योग्य नाही. उलट त्या लोकांबद्दल आपली जबाबदारी असते. आपणं या वातावरणात तोपर्यंत टिकणार नाहीत, जोपर्यंत आपण आपली संवेदनशीलता वाढवत नाही. यामुळे तुम्ही परिस्थिती स्वीकारणे योग्य राहील. असहि ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.