कडक उन्हाळ्यात गाडीची टाकी फुल केल्यास स्फोट होतो? Indian Oil ने दिली महत्त्वाची बातमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कडक उन्हाळा आहे. उन्हामुळे सर्वसामान्य माणसाला घराबाहेर फिरूनही मुश्किल होत आहे, त्यातच गाडीवरून भर दुपारचा प्रवास करणं सुद्धा काही सुखाचं नाही. त्यातच अलीकडच्या काळात उन्हाच्या कडाक्याने गाड्यांमध्ये बिघाडी आल्याच्या किंवा ओवरहीटिंगची प्रकरणे आपण पाहतच आहोत. भरीस भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाही मसग पसरत आहे कि भर उन्हाळ्यात इंधनाची टाकी एकदम फुल केल्यास गाडीचा स्फोट होऊ शकतो . या व्हायरल पोस्टमुळे सर्वसामान्य लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. हा दावा किती खरा आणि किती खोटा याबाबत सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने ट्विट करत माहिती दिली आहे.

इंडियन ऑइलने आपल्या ट्विटर हँडलवरून सध्या सुरु असलेल्या अफवांवर भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी फेक न्यूज आणि फॅक्ट चेक यातील फरक सांगितलं आहे. वाहनात पेट्रोल-डिझेल भरताना टाकीचा अर्धाच भाग भरा, ती पूर्ण भरल्यास आग लागू शकते अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत असं म्हणत इंडियन ऑइलने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

ऑटोमोबाईल उत्पादन सुरक्षा घटकासह कार्यक्षमतेची आवश्यकता, दावा आणि सभोवतालची स्थिती या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांचे वाहन डिझाइन करतात. पेट्रोल किंवा डिझेल वाहनासाठी इंधन टाकीमध्ये निर्दिष्ट केलेले कमाल मूल्य यासाठी अपवाद नाही. त्यामुळे हिवाळा किंवा उन्हाळा असो, उत्पादनाद्वारे निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत वाहनांमध्ये इंधन भरणे सुरक्षित आहे असे इंडियन ऑइलने स्पष्ट केलं आहे.