हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक असल्याचे, यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.
मोदी म्हणाले, ज्याला कोरोना लशीची जास्त गरज त्याला प्राधान्याने कोरोना लस मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार आहे. तसेच तुम्हाला पहिलं लसीकरण झाल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती तुमच्या फोनवर दिली जाणार आहे.
कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला डोस घेतला व नंतरचा डोस घेणं विसरले, अशी चूक करू नका. जसे की तज्ज्ञं सांगत आहेत, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिनाचे अंतर ठेवले जाईल. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे, दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या शरिरात करोनाच्या विरोधात लढण्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागला, मास्क काढून ठेवलं, सुरक्षित अंतर ठेवणं विसरलात…तर काही उपयोग होणार नाही. मी विनंती करतो की असं करू नका.”
#WATCH live: PM Modi launches nation-wide COVID-19 vaccination drive via video conference. https://t.co/ZS0oJofkVl
— ANI (@ANI) January 16, 2021
मोदी पुढे म्हणाले, जगातील 60 टक्के लहान मुलांना जीवनरक्षक लसी दिल्या जातात त्या भारतात बनतात. जगाचा मेड इन इंडिया कोरोना वॅक्सिननमध्ये विश्वास वाढणार आहे. जगातील सर्वात कमी किमंत असणाऱ्या भारताच्या लसी आहेत. मास्क, पीपीई किट या वस्तू आयात कराव्या लागल्या, मात्र भारत सध्या त्या गोष्टींमध्ये आत्मनिर्भर झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’