नवी दिल्ली । प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) चालू आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्ये आतापर्यंत 26,276 कोटी रुपयांची रक्कम 15.47 लाख करदात्यांना रिफंड केली आहे. हे आकडे 1 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान जारी केलेले रिफंड आहेत. ही माहिती देताना विभागाने सांगितले की, वैयक्तिक इनकम टॅक्स खाली 15.02 लाखाहून अधिक करदात्यांना 7,538 कोटी रुपये दिले गेले आहेत, तर कंपनी टॅक्स प्रमुखांतर्गत, 44,531 करदात्यांना 18,738 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
CBDT issues refunds of over Rs. 26,276 crore to more than 15.47 lakh taxpayers between 1st April, 2021 to 31st May, 2021. Income tax refunds of Rs. 7,538 crore have been issued in 15,02,854 cases & corporate tax refunds of Rs. 18,738 crore have been issued in 44,531 cases.
— Income Tax India (@IncomeTaxIndia) June 4, 2021
प्राप्तिकर विभागाने ट्विटरवर म्हटले आहे की, सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान 15.47 लाखाहून अधिक करदात्यांना 26,276 कोटींपेक्षा जास्त टॅक्स परत केले आहेत. ”
मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये प्राप्तिकर विभागाने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड दिला होता. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देण्यात आलेल्या 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंड पेक्षा ही 43.2 टक्के अधिक आहे.
याप्रमाणे रिफंडचे स्टेट्स तपासा
>> यासाठी तुम्हाला आयकर ई-फाईलिंग वेबसाइटवर जावे लागेल. येथे आपण आपल्या पोर्टलवर लॉगिन कराल. पोर्टल लॉगिनसाठी तुम्हाला तुमचा पॅन नंबर, ई-फाईलिंग पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करावा लागेल.
>> तुमचे पोर्टल प्रोफाइल उघडताच तुम्हाला ‘View returns/forms’ वर क्लिक करावे लागेल.
>> पुढील स्टेप मध्ये आपण ड्रॉप डाऊन मेन्यूमधून ‘Income Tax Returns’ वर क्लिक करून सबमिट कराल. हायपरलिंक अकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल.
>> या स्क्रीनवर आपल्याला टाइमलाइन, प्रोसेसिंग टॅक्स रिर्टन याविषयी माहिती मिळेल. यात फाईलिंग करण्याच्या तारखेची माहिती, रिटर्नच्या वेरिफाइची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, रिफंड देण्याची तारीख आणि पेमेंट रिफंड याविषयी माहिती असेल.
>> जर आपला टॅक्स रिफंड अयशस्वी झाला तर आपण या स्क्रीनवर आपल्याद्वारे दाखल केलेला रिफंड अयशस्वी होण्याचे कारण सांगितले जाईल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा