हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लसीकरण सुरु आहे. पण दुर्देवाने लसी कमी पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा सर्वाधिक साठा आहे ते दाखवून द्यावं. आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसं घाबरवू? महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करु शकत नाही. आम्हाला लसी कमी पडत आहेत म्हणूनच तर लसी मागत आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी दिल्लीच्या बाजूने न बोलता महाराष्ट्राच्या बाजून बोलावं. त्यांनी लसीची मागणी केली असती तर बरं झालं असतं”, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. “सांगली जिल्ह्यासाठी आम्हाला 2 लाख 64 हजार लस मिळाल्या होत्या. त्यापैकी 2 लाख 59 हजार लसी आम्ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात, जिल्ह्यात लसीकरणाची व्यवस्था केल्या. आता फक्त चार हजार लसी शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात जास्त कोरोनाचा फैलाव आहे. महाराष्ट्राची तुलना गुजरातशी होऊच शकत नाही.
गुजरातची संख्याही साडेसहा कोटी तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी आहे. तिथे महाराष्ट्राच्या तुलनेत कमी कोरोनाबाधित आहेत. आम्हाला महाराष्ट्रात लसी हवी आहेत. आमची आरोग्य यंत्रणा व्यवस्थित आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात लीसकरण करायचं आहे. म्हणून महाराष्ट्रात आम्हाला लवकरात लवकर लसी देण्यात यावेत”, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.