मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी। निवडणूक कुठलीही असो ती जिंकणे हेच प्रत्येक उमेदवाराचे ध्येय अंतिम असते. काहींच्या पदरी यश मिळते तर काहींच्या अपयश. मात्र, या सगळयात मेहनत करून, लोकांची कामे करूनसुद्धा यश न मिळण्याची खंत वाटून जर एखादा उमेदवार भावुक झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? जालना जिल्ह्यात मात्र अशीच काहीशी घटना निवडणूक प्रचारा दरम्यान घडली.

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.

गावकऱ्यांनी देखील चौधरी यांना अश्रू अनावर होताच त्यांची समजूत घालत या निवडणुकीत साथ देण्याचं आश्वासन दिलं. चौधरी यांनी आतापर्यत २ विधानसभा निवडणुका लढवल्यात. गेल्यावेळी देखील त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता.

इतर काही बातम्या-