‘जलयुक्त शिवार’मुळं मराठवाड्यात महापूर; पर्यावरणतज्ज्ञांचा आरोपानंतर फडणवीसांच्या योजनेवर प्रश्नचिन्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या पूरस्थितीला भाजप सरकारमधील जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे असा आरोप पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीनं राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे,’ असे ते म्हणाले.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामं करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्याच वेळेला महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करू नका. आता त्याची फळं आपण भोगत आहे अस अतुल देऊळगावकर यांनी म्हंटल.

आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीने केलं जातं. सर्व कामं बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तसं केलं जातं. त्यामध्ये तज्ज्ञांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे त्याची ही परिणीती आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment