जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात काल १११ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 3082 झाली आहे. यात जळगाव शहर 55, भुसावळ 17, जळगाव ग्रामीण 8, चोपडा 1, धरणगाव 6, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3, रावेर 4, पारोळा 1, पाचोरा 1, बोदवड 4 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रूग्ण शोध मोहिम सुरू असल्याने रूग्ण वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
जळगाव जिल्ह्यात काल शनिवारी 73 रूग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 1839 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 1022 रूग्ण उपचार घेत आहे. काल नवीन 111 कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 3082 झाली तर उपचारादरम्यान 221 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणा-या संशयित रुग्ण शोध पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरीत तपासणी, त्वरित उपचार (ट्रेस, टेस्ट व ट्रीट) या ट्रीपल ‘टी’ तत्वांचा अवलंब करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिमेमुळे बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. नागरीकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
#जळगाव आज १११ #कोरोना बाधित रूग्ण आढळले यात जळगाव शहर 55, भुसावळ 17, जळगाव ग्रामीण 8, चोपडा 1, धरणगाव 6, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3, रावेर 4, पारोळा 1, पाचोरा 1, बोदवड 4 रुग्णांचा समावेश. जिल्ह्यात रूग्ण शोध मोहिम सुरू असल्याने रूग्ण वाढ, नागरिकांनी घाबरू नये @abhijitraut10 pic.twitter.com/R1IphMUO2G
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) June 27, 2020