नवी दिल्ली | जम्मू कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या दृष्टीने राज्यसभेत आज अमित शहा यांनी प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील एक जम्मू कश्मीर पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे. त्यावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरु आहे. मात्र कलम ३७० पूर्णपणे काढून नटाकता त्यातील विशेष दर्जा प्रधान करणारा भाग हटवण्यासाठी सरकार विधेयक घेऊन आले आहे.
अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )
जम्मू कश्मीर राज्यासाठी केंद्र सरकार नव्याने नियम लागू करू पाहत आहे. आता जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा देखील काढून घेतला जाणार असून जम्मू कश्मीर हा इथून पुढे अर्धराज्य अर्थात विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश असणार असल्याचे विधेयक आज मांडले गेले आहे. त्याच प्रमाणे लेह आणि लडाख कश्मीर पासून वेगळे करण्यात येणार असून तो भाग विधानसभा नसणारा केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार आहेअसे विधेयकात नमूद करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिली आहे.
दरम्यान राज्यसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. त्यानंतर अमित शहा यांनी आम्ही विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील आहोत. तुम्ही या संदर्भात चर्चा करा गोंधळ घालू नका असे आवाहन केले.