नवी दिल्ली | जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३५ अ आणि कलम ३७० मध्ये सुधाणार करण्याचे विधेयक आज राज्यसभेत प्रस्तुत करण्यात आले आहे. या विधेयकाला प्रस्तुत करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला.त्यावेळी मतदान घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या सभापतींच्या दिशेने विरोधी पक्षाचे सदस्य सरसावले आणि त्यांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. त्यावेळी सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या व्यंकय्या नायडू यांनी प्रस्ताव आवाजी मतदानाने सम्मत केले.
Union Home Minister Amit Shah in Rajya Sabha: I am ready for all discussions by the leader of the Opposition, the entire opposition and the members of the ruling party over Kashmir issue. I am ready to answer all questions. pic.twitter.com/AKs365vBiH
— ANI (@ANI) August 5, 2019
प्रस्ताव संमत झाल्यानंतर जम्मू कश्मीर आरक्षणाचे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. सभागृहात शिष्टाचारनुसार विधेयकाच्या प्रति प्रत्येक सदस्यांना वाटण्यात आले. त्यानंतर देखील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपला गदारोळ थांबवला नाही. विरोधी पक्षांच्या गदारोळातच संसदीय कामकाज मंत्री आणि कायदा मंत्री यांनी आपली मते मांडली.
दरम्यान विरोधी पक्ष नेते गुलाम नभी आझाद यांनी कश्मीर मध्ये निर्माण झालेल्या तणावावर बोलण्याचे आवाहन सत्ताधारी पक्षाला केले. कश्मीर मध्ये एवढ्या प्रमाणावर सेना का तैनात केली आहे. तेथील माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते नजर कैदेत का ठेवले आहेत असे सवाल यावेळी गुलाम नभी आझाद यांनी उपस्थित केले.