श्रीनगर । जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांसोबत उडालेल्या जोरदार चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. श्रीनगरच्या कानीमजार नावाकदाल भागात ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. जम्मू कश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या(सीआरपीएफ) पोलिसांनी ही संयुक्त कारवाई जोरदार कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील नावाकदल परिसरात सोमवारी रात्री सीआरपीएफ, काश्मीर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाला आहे. दरम्यान, सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर सुरक्षा दलाने सर्व बाजूंनी परिसर घेरत या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे. ही चकमक सुरु असताना संपूर्ण राज्यातील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
Jammu and Kashmir: An encounter broke out between terrorists and security forces in Nawakadal area of Srinagar on the intervening night of 18-19 May. Mobile internet services have been snapped in Srinagar. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Sg9DEO7t8C
— ANI (@ANI) May 19, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”