Tuesday, June 6, 2023

काश्मिरात २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

मुंबई । जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. ही दुसरी मोठी कारवाई आहे. दहतवाद्यांची घुसखोरी सुरु आहे. गेल्या आठवड्यातही चकमक झाली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीर येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाम परिसरात अजूनहीसर्च ऑपरेशन सुरु आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील या जिल्ह्यातील वानपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर हा परिसर घेरला गेला होता आणि शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवादानं पुन्हा एकदा तोंड वर काढलेलं दिसतंय. याविरुद्ध सुरक्षादलाकडून आपली कारवाई तेज केलीय. उल्लेखनीय म्हणजे, कुलगाममध्ये गेल्या पाच दिवसांत हे दुसरं ऑपरेशन आहे. यापूर्वी मंजगाम भागात सुरक्षा दलानं एन्काऊंटरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दरम्यान, एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील वानपुरा भागात दहशतवादी असल्याचं गुप्त सूचना मिळाल्यानंतर या परिसराला वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. याच दरम्यान सुरक्षादलावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला त्यानंतर उत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत दोन जणांना ठार करण्यात आलं. सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”