हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jandhan Account : जन धन खाते धारकांसाठी ही बातमी खूप महत्वाची ठरेल. जन धन खात्यामध्ये अनेक सुविधा दिल्या जातात. हे लक्षात घ्या की, केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत झिरो बॅलन्स बचत खाते उघडता येते. यामध्ये ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदे देखील मिळतात.
या जन धन योजनेंतर्गत (Jandhan Account) आता खात्यामध्ये बॅलन्स नसला तरीही 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखीच असेल. यापूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. जी आता सरकारने वाढवून 10 हजार रुपये केली आहे.
नियम जाणून घ्या
या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठीची वयोमर्यादा 65 वर्षे आहे. तसेच ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपले जन धन खाते किमान 6 महिने जुने असले पाहिजे. मात्र तसे नसल्यास फक्त 2 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट उपलब्ध असेल.
जन धन खाते म्हणजे काय ???
प्रधानमंत्री जन धन योजना (Jandhan Account) हा केंद्र सरकार कडून राबविण्यात येणार सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे. ज्याद्वारे बँकिंग/बचत आणि डिपॉझिट अकाउंट, रेमिटन्स, लोन, इन्शुरन्स, पेन्शनमध्ये प्रवेश सुनिश्चित केला जातो. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटवर उघडले जाऊ शकते. PMJDY खाती झिरो बॅलन्सवर उघडता येतील.
अशा प्रकारे उघडा खाते ???
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत (Jandhan Account) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाती उघडली जात आहेत. मात्र, जर आपल्याला हवे असेल तर जन धन खाते खाजगी बँकेतही उघडू शकता. जर तुमचे दुसरे बचत खाते असेल तर तुम्ही ते जन धन खात्यात बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून जास्त आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmjdy.gov.in/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा