कृषी विभागाच्यावतीने शेतावर भेटी देऊन जनजागृती अभिमान

जालना :- ढगाळ वातावरणामुळे बहारात आलेल्या तुरीमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अंबड तालुका कृषी विभागाच्या वतीने अंतरवाली सराटी ता.अंबड येथे थेट शेतावर भेटी देऊन जनजागृती अभिमान सुरू केले आहे.

दि १ डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत तूर: एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळा तालुका कृषि अधिकारी सचिन गिरी,मंडळ कृषि अधिकारी कल्याण शिंदे,कृषि सहायक संकेत डावरे,लहू क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक संकेत डावरे म्हणाले की,तूर पिकावरील पडणाऱ्या शेंगा पोखरणारी अळी,शेंग माशी,पिसारी पतंग,पाने गुंडाळणारी अळी इत्यादी किडींची माहिती व व्यवस्थापन करावे.

तसेच किडनियंत्रणासाठी ५०-६०/हे पक्षी थांबे किंवा हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावे.१ मिटरमध्ये ४-५ अळ्या आढळुन आल्यास  इमामेकटींन बेन्झोएट ५% जी ४-५ ग्रॅम/१० लिटर किंवा क्लोराट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३-५ मिली/१० लिटीर हे १५ दिवसांच्या अंतराने फवारणी घेण्यास यावेळी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांना फेरोमोन ट्रॅपचे सापळे वाटप करण्यात येवुन हरभरा लागवड तंत्रज्ञान व ऊस पाचट व्यवस्थापन या बद्दलही यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येवून
या कार्यक्रमात शपथ काळ्या आईची देण्यात आली.

या कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब दखणे,अंकुश तारख,बप्पासाहेब काळे,पांडुरंग गावडे,रवींद्र घाडगे,विष्णूदास खटके,पांडुरंग काळे,बळीराम रोडी,राहुल कोटंबे,योगेश रोडी आदीची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

You might also like