मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले तेव्हा हे गप्प का होते?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील राज्य सरकारचे अनेक प्रकल्प होते. मात्र, त्यावेळच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत जेव्हा आल्या. तेव्हा त्या मुंबईत काय आहे असे म्हणाल्या. त्यांची भाषा हि उर्मटपणाची होती. असे म्हणून मुंबईतील राज्य सरकारचे अनेक आतंरराष्ट्रीय प्रकल्प गुजरातला पळवले. त्यावेळी भाजपमधील हे लोक गप्प का होते? आणि आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत काय ठेवलंय, अशी वक्तव्य केल्यानंतर भाजपला मिरच्या का झोंबल्या? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आजच्या घडीला आरोप त्यारोप करण्याला काही अर्थ नाही. आमच्याबद्दल विरोधकांना पोटशूळ आहे. ममता बॅनर्जी या मुंबई आल्या आहेत. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत उद्योगनगरीची माहिती घेतली. मुंबईतल्या उद्योगपतींचे देशभरात व्यवसाय आहेत. ममता बॅनर्जींनी त्या उद्योगपतींना कोलकात्यात लक्ष देण्याचे आवाहन केले त्यात त्यांचे काय चुकले?

राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मुंबईतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र गुजरातला पळवून नेले तेव्हा भाजपचे बोलभीडू शेपूट घालून का बसले? योगी आदित्यनाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करीत आहेत. ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.आज vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय.आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून, असे ट्विटमध्ये राऊत यांनी म्हंटले आहे.

आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्ध मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत. व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला पळवले. आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत काय ठेवले? अशी वक्तव्य केले होते. यूपीए आणि एनडीए मला दिसत नाही. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारखे लोक संघटन तयार करत असतील तर त्याकडे आम्ही डोळसपणे पाहतो. नेता कोण हा प्रश्न नसून पर्याय महत्वाचा आहे. भाजपच्या लोकांना तोंडातून डायरिया झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment