हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पावसाळा सुरू झाल्यावर तर डासांची (mosquitoes) उत्पत्ती वाढते. डास (mosquitoes) चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होतात. वेळीच उपचार केले नाही, तर जिवावरही बेतू शकतं. म्हणूनच डास चावू नयेत, म्हणून काळजी घ्यायला हवी. या डासांना प्रतिबंध करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्रीम, रोलऑन किंवा इलेक्ट्रिक उपकरणं सध्या उपलब्ध आहेत. डास (mosquitoes) मारण्यासाठी रॅकेटही असते; पण हे सगळं करूनही डास (mosquitoes) आपल्या आजूबाजूला असतातच. या डासांना (mosquitoes) आळा घालण्यासाठी एका जपानी कंपनीनं यावर एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी चतुराच्या आकाराचं एक पेंडंट तयार केलं आहे. हे पेंडंट घातल्यामुळे डास दूर राहतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
आकाशात उडणाऱ्या चतुराशी अनेक लहान मुलं खेळतात. त्याला हेलिकॉप्टर अशा नावानंही मुलं हाक मारतात. या किड्याला ड्रॅगनफ्लाय असं म्हणतात. हे कीटक पृथ्वीवरचे सर्वांत यशस्वी शिकारी मानले जातात. व्याघ्र वर्गातल्या प्राण्यांच्या तुलनेत चतुरांचा शिकार पकडण्याचा दर अधिक असतो. याचाच उपयोग डासांना पळवण्यासाठी करण्यात आला आहे. एका जपानी कंपनीनं डासांना (mosquitoes) दूर पळवण्यासाठी ड्रॅगनफ्लायच्या आकाराचं पेंडंट तयार केलं आहे. हे गळ्यात घालण्याचं लॉकेट आहे. त्याला ड्रॅगनफ्लायचा आकार देण्यात आला आहे. ते घातल्यावर डास किंवा इतर किडे त्या व्यक्तीपासून लांब राहतील. म्हणजेच कोणतंही केमिकल किंवा धुराशिवाय डासांना लांब ठेवता येऊ शकेल. हे पेंडंट मिकी लोकोस या जपानी कंपनीने तयार केले आहे.
हे पेंडंट पीव्हीसीपासून तयार केलं आहे. त्याची लांबी 100 मिलीमीटर आहे, तर एका पंखापासून दुसऱ्या पंखापर्यंतची रुंदी 130 मिलीमीटर आहे. हे गळ्यात घालण्याचं पेंडंट आहे; मात्र यासोबत एक क्लिपही येते. त्याचा वापर करून हे पेंडंट कपड्यावर कुठेही लावता येतं. त्यामुळे डास(mosquitoes), किडे, माश्या, मधमाशी असे कीटक तुमच्यापासून लांब राहतील, असा दावा मिकी लोकोस या जपानी कंपनीकडून करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल