जरंडेश्वर कारखाना साडेतीन महिन्यात सभासदांच्या ताब्यात देणार : आ. महेश शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जरंडेश्वर कारखान्याची 1 हजार कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत कारखाना सभासदांचा करणार आहे. मी जे बोलतो ते करतोच आणि करून दाखवले आहे. स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणाऱ्या चेल्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालु केले आहे, असा आरोप शिवसेना बंडखोर आ. महेश शिंदे यांनी केला आहे.

महेश शिंदे हे शिवसेनेतून आमदार झाल्यापासून त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांवर अनेकदा आरोप केलेले आहेत. कोरेगाव तालुक्यातील कुमठे फाटा येथे आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा जरंडेश्वर कारखाना, रयत शिक्षण संस्था, अजित पवार, शरद पवार यांच्यासह आ. शशिकांत शिंदेवर यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. तसेच कारखाना सभासदांच्या मालकीचा केवळ साडेतीन महिन्यात करणार असल्याचा शब्दही आ. महेश शिंदे यांनी दिला.

रयत शिक्षण संस्था आणि जरंडेश्वर चोरला

आ. महेश शिंदे म्हणाले, तुम्ही यशवंतराव चव्हाणांचे विचाराचे आहात. तर सामान्य माणसाला मालक करायचा हा चव्हण साहेबांचा विचार होता. परंतु त्याचे पाईक सभासदांना आणि शेतकऱ्यांना गुलाम बनावायचे चालले आहे, आणि भाडवलदारांना मालक बनवत आहेत. जोपर्यंत तुम्ही चव्हाण साहेबांच्या विचारा बरोबर होता, तोपर्यंत सातारा जिल्हा तुमच्यासोबत होता. तेव्हा मी आवाहन करतो, तुम्ही चोरलेल्या गोष्टी आहेत, त्या सोडा. रयत शिक्षण संस्था आणि जरंडेश्वर कारखाना तुम्ही चोरला. जर तुम्ही चोरलेल्या गोष्टी सोडणार नसाल तर या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक युवकांच्या मनगटात त्या गोष्टी परत घ्यायची ताकद आहे. आम्ही जिल्ह्यातील सर्व संघटना गुलमगिरीतून मुक्त करू.

Leave a Comment