व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

डिस्चार्ज मिळताच जयकुमार गोरेंचे माणच्या जनतेकडून जंगी स्वागत; संपूर्ण गोरे कुटुंबीय झाले भावुक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा गेल्या आठवड्यात भीषण अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला असून ते एअर ॲम्बुलन्सद्वारे माण मधील आपल्या घरी आले. गोरे यांनी आपल्या कर्मभूमीत पाऊल टाकताच माणच्या जनतेने त्यांचे जंगी स्वागत केले . जनतेचे हे प्रेम पाहून जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय देखील भावुक झाले

आमदार जयकुमार गोरे हे गेल्या काही दिवसांपूर्वी अधिवेशन संपवून पुण्यातून माणच्या दिशेने येत असताना त्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास फलटण येथील मलटण गावाच्या पुलावर भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्यासह त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

आपल्या नेत्याचा अपघात झाला असून त्याला पाहण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये रीग लावली होती. मात्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमदार जयकुमार गोरे यांना कोणालाही भेटता आले नाही. त्यामुळे गेली अनेक दिवस आपल्या नेत्याच्या भेटीसाठी आतुर असलेल्या माणच्या कार्यकर्त्यांना आज अखेर जयकुमार गोरेंचे दर्शन झाल्याने या सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष करत माण नगरीमध्ये त्यांचे जंगी स्वागत केले आहे. आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून आ.जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.