टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे संजू सॅमसन टीम इंडियामधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज पार पडणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवत आघाडी घेतली आहे. मात्र दुसरा सामना सुरु व्हायच्या अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा विकेटकिपर बॅट्समन संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतीमुळे टी 20 मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे.

संजू सॅमसन टी 20 मालिकेतून बाहेर
संजूला (Sanju Samson) मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. संजूला कॅच पकडताना गुडघ्याला दुखापत झाली होती. टीम इंडियात हा बदल दुसऱ्या सामन्याच्या 24 तासांआधी करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजू सॅमसनच्या (Sanju Samson) जागी अमरावतीच्या विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया
इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल/वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, युझवेंद्र चहल, उमरान मलिक

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती