हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपचे उल्लंघन करत भाजपला पाठींबा देत भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना निवडणूक आणले. त्यानंतर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदाराच्या निलंबनाबाबत मोठे विधान केले आहे.
जयंत पाटील यांनी विधासभेच्या विशेष अधिवेशनावेळी सभागृहाबाहेर येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या ज्या बंडखोर आमदारांनी बंडखोरी केली आहे. आणि शिवसेनेच्या विरोधात मतदान केले आहे त्या आमदारांचे नक्कीच निलंबन होणार आहे. यासाठी दोन तीन महिन्यांचा वेळ लागेल. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा होणार आहे. त्यासंदर्भात योग्य तो निर्णय शरद पवार घेतील, असे पाटील यांनी दिले.
पळपुट्या आमदारांच्यात डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत नाही : ठाकरे
अधिवेशादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, बंडखोर आमदारांनी व्हीप मोडलेला आहे आणि उपाध्यक्षांकडे याचा विरोध केला आहे. एकाही पळालेल्या आमदाराने डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. आज त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही पण मतदारांकडे गेल्यानंतर काय सांगणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.