…म्हणून आम्हीही बेरीज करत राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवार उभे करत अर्ज दाखल केले जात आहेत. आज भाजपच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्यातील ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्क दाखल केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोडेबाजाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची आम्हीही बेरीज केली. तेव्हा आमचा कोटा पूर्ण होतोहे लक्षात आल्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला,” असे पाटील यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री ज्यात पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या प्रमाणे निवडणुकीत भाजपाला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीलाही कमी पडतात. परंतु आम्ही आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली. त्यावेळी लक्षात आले कि आमचा कोटा पूर्ण होतोय. त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला.

आता अर्ज दाखल केल्यानंतर जेव्हा उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत कोण आणि किती आमदार राहतील? कोण राहणार नाही. हे स्पष्ट होईल आणि याचा विचार सर्वच पक्ष करतील. आतापर्यंत तर कधी महाराष्ट्र विधानसभेत घोडेबाजार पाहिलेला नाही, त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजपा करणार नाही,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.