Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने डेली 3GB डेटा असलेल्या अनेक प्लॅनची ऑफर आणली आहे. जिओच्या युझर्सना नेहमीच जिओकडून स्वस्त आणि चांगल्या प्लॅनची ​​अपेक्षा असते. हे लक्षात घ्या कि, जिओच्या युझर्सकडून सर्वांत जास्त डेटा वापरला जातो. अशाच ग्राहकांसाठी जिओने 3GB डेटा असणारे चार प्लॅन्स लाँच केले आहेत.

या प्लॅन्समध्ये 28 दिवस ते एक वर्षांपर्यंतची व्हॅलिडिटी देखील दिली जात आहे, तसेच यामध्ये ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम प्लॅनचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. चला तर मग जिओच्या या प्लॅन्सबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात…

Jio Introduces Rs 2399 Annual Prepaid Plan With 2GB Daily Data, New Data  Add-Ons Also Announced

419 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये युझर्सना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह डेली 3GB इंटरनेट डेटा मिळत आहे. याशिवाय यामध्ये जिओचे अनेक Apps, डेली 100 SMS, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहेत.

Reliance Jio Introduces Cheapest Prepaid Recharge Plan In India Costs Re 1  For 30 Days

601 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह युझर्सना डेली 3GB इंटरनेट डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये 6GB चा अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. इतकेच नाही तर युझर्सना डेली 100 एसएमएस, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि जिओ सिनेमासारख्या सुविधा देखील मिळतात. या प्लॅनमध्ये Diseny Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे.

Jio's new Disney+ Hotstar Mobile prepaid plans: Checks recharge prices,  validity - Smartprix

1199 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये युझर्सना 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह डेली 3GB इंटरनेट डेटा मिळेल. याशिवाय 100 एसएमएस, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि जिओ सिनेमा बरोबरच जिओच्या इतर Apps चे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे.

Reliance Jio Rs 583 vs Rs 553 recharge plan: Which prepaid plan is better?  - Technology News

4199 रुपयांचा प्लॅन

Jio चा हा सर्वात मोठा प्लॅन आहे. यामध्ये युझर्सना 365 दिवसांसाठी डेली 3GB डेटा मिळेल. याशिवाय, युझर्सना डेली 100 एसएमएस, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि Jio Cinema सह अनेक Jio Apps देखील मिळतील. तसेच यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम प्लॅनचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?category=Popular%20Plans&categoryId=UG9wdWxhciBQbGFucw==

हे पण वाचा :

EPFO मध्ये ई-नॉमिनेशन कसे करावे ते जाणून घ्या

Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!

UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात दिला अडीच पट नफा !!!

Drugs Case : सिद्धांत कपूर आधी बॉलीवूडच्या ‘या’ बड्या सेलिब्रिटींचीही ड्रग्ज प्रकरणात झाली आहे चौकशी !!!