हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने अलीकडेच दोन नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. जिओच्या या नवीन प्लॅनची किंमत अगदीच कमी आहे. आता जिओच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये 349 रुपये आणि 899 रुपये या दोन नवीन प्लॅनचा समावेश करण्यात आला आहे. यामधील जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवस तर 90 दिवसांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवसांची आहे. असे मानले जात आहे की, आपला ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी कमाई) वाढवण्यासाठी जिओकडून हे प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेउयात…
349 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 2.5 जीबी डेटाचा लाभ, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतील. याबरोबरच या प्लॅनमध्ये जिओ Apps मध्ये एक्सेस देखील मिळेल. ज्यामध्ये JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud चा समावेश असेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची असेल.
899 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 2.5 जीबी डेटाचा लाभ, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतील. तसेच या प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवसांची असेल. यासोबतच जिओ Cinema, जिओ TV, जिओ Security आणि JioCloud यासह जिओ Apps मध्ये फ्री एक्सेस देखील मिळेल.
5G ऑफरसह योजना लॉन्च केल्या आहेत
जिओकडून ग्राहकांसाठी 5G वेलकम ऑफर अंतर्गत 349 आणि 899 रुपयांचे दोन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. आता तर जिओने देशातील आणखी 50 शहरांमध्ये 5G सर्व्हिस सुरु केल्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे, आता देशातील एकूण 5G शहरांची संख्या 184 वर पोहोचली आहे. जिओने जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश केला आहे. जिओ आता 5G वेलकम ऑफर अंतर्गत आमंत्रित ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 5G ऑफर करत आहे. आता ग्राहकांना 5G वर 1 Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/5g
हे पण वाचा :
LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!
Bank FD : ‘या’ खाजगी बँकेने FD वरील व्याजदर पुन्हा वाढवले, नवीन दर तपासा
Post Office ची जबरदस्त स्कीम, फक्त 3000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे मिळवा लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनांमधून मुदतीआधीच काढू नका पैसे, अन्यथा भरावा लागेल इतका दंड
Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने एफडीचे दर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज मिळवण्याची संधी