हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह ३० पेक्षा जास्त आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदरी सोपवली आहे. तसेच आव्हाड हे पक्षाचे मुख्य प्रदोतही असतील.
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदासह पक्षाचे मुख्य प्रदोत पदही देण्यात आलं आहे. अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते तर अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद होते. अनिल पाटील हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर मुख्य प्रतोदपदाची जबाबदरी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनाच देण्यात आली आहे. म्हणजेच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोन्हीही आता ठाणे जिल्ह्याचे आहेत.
दरम्यान, माझी प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यामुळे माझाच व्हीप लागू होईल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड पाटील यांनी दिली. ज्या नेत्याने आत्तापर्यन्त २५- २५ वर्ष तुम्हाला आमदार केलं, मंत्रीपदे मिळवून दिली त्याच नेत्याला त्याच्या अखेरच्या काळात अश्या परिस्थितीमध्ये आणणं हे माणुसकीला पटणार नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांसह बंडखोर आमदारांवर संताप व्यक्त केला आहे.