ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
जितेंद्र आव्हाड यांना आज ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आव्हाड यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे समजत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःला सेल्फ क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना पॉझिटीव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
दरम्यान, मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. या कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड देखील होते. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वॉरंटाईन म्हणजेच ‘होम क्वॉरंटाईन’चा तसेच याच पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकारही होते. त्यांनाही सेल्फ क्वॉरंटाईनचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्यानंतर यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय?
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 21, 2020
राजा नागडा आहे हे सांगायची हिंमत आता आपल्यालाच करावी लागेल
वाचा हा परखड रिपोर्ट👉🏽 https://t.co/vOW1DnL1Iv#COVIDー19 #coronavirus #RSS_terrorist_Organization #Corona #NarendraModi #RapidTestKits