सोलापूर प्रतिनिधी | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याकडे लक्ष देतं नाहीत म्हणून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्याचाच परिणाम म्हणून आज सोलापूर जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाले आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता सोलापूरच पालकत्व आलेलं आहे.
माजी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ८३ दिवसांमध्येच उचलबांगडी करण्यात आलीय.
एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून दिलीप वळसे पाटलांकडे पाहिले जाते. मात्र कोरोनाचा राक्षस थैमान घालत असताना वळसे पाटीलांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यामुळे ठाकरे सरकारने वळसे पाटलांची सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केलीय.
दरम्यान स्वतःच्या हटके अंदाजाने नियमित चर्चेत असणारे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता सोलापूरचा पालकमंत्री पद आल्याने ते सध्य परिस्थितीला कशा पद्धतीने हाताळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न
जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन
तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका