लवकरच ठाण्यातील एका बढया नेत्याच्या बंगल्यावर हातोडा पडणार; जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटातील वादाबाबत मोठं विधान केले आहे. “नुकतीच भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये हाणामारी झाली आहे, त्यावरूनच काय सुरू आहे ते ओळखावे. आणि दोन दिवस थांबा, ठाण्यात कुणाचा बंगला तुटेल, ते तुम्हाला कळेल. लवकरच ठाण्यातील एका बढया नेत्याच्या बंगल्यावर हातोडा पडणा,” असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लवकरच ठाण्यातील एका सेनेच्या नेत्यावर कारवाई होणार आहे. कारवाई कोणावर होणार? हे तुम्हाला दोन-चार दिवसात कळेलच. जेव्हा काहीजण बंगला पाडण्यासाठी जातील, तेव्हा तुम्हाला कळेल. जरा थांबा… थोडा सस्पेन्स राहू द्या.

दोन गाड्यांमधून समोरासमोरून गोळीबार होतो. या प्रकरणात केवळ एकावरच गुन्हा दाखल केला जातो. दुसऱ्याला सोडून दिले जाते. त्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही. एकाच्या छातीत गोळ्या घुसल्या, त्याची तक्रारच दाखल करून घेतली नाही. म्हणजे आम्ही सांगितलं तरच तक्रार घ्यायची, आम्ही सांगितलं नाही तर तक्रार घ्यायची नाही, असा कारभार सुरू आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी कोण चालवत आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे,” असा गौप्यस्फोट आव्हाड यांनी केला.