हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणीचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. पी. बी. वारले आणि ए. एम. मोडक या द्विसदस्यीय खंडपीठाने आज हा निर्णय दिला आहे.
दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी करमुसे यांचेअपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी घटना घडली होती. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई होऊ कोर्टात दाखल करण्यात आली. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे निवासस्थानी नेले. त्यावेळी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी करमुसे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. 14 ऑक्टोबर 2021 रोजी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी तब्बल दोन वर्षानंतर मुंबई हाय कोर्टाने आज निकाल दिला.