अमोल कोल्हेंची कृती ही नथुराम गोडसेचे समर्थनच : जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे नथुराम गोडसेंची भूमिका साकारणार आहेत. याबाबत नुकतीच त्यांनी सोशल मिडीयावर माहिती दिली होती. व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हेंची कृती ही नथुराम गोडसेचे समर्थनच असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार असल्याची भुमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे.

अमोल कोल्हे आपल्या भूमिकेवर ठाम असले तरी या वादावर आता राजकारण तापताना दिसतंय. काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनीदेखील अमोल कोल्हे यांनी ही भूमिका टाळायला हवी होती असं मत व्यक्त केलं आहे. हुसैन दलवाई पुढे म्हणाले की, ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला ती भूमिका कशाला करायची? गांधीजी किंवा नेहरुंची भूमिका करायची. इतकी हिंस्त्रक भूमिका कशाला करायची? ते चूक आहे. ती भूमिका साकारताना त्यांनी ती भूमिका किती छान केली ते पण दाखवावं लागेल. ते कलाकार आहेत हे मान्य आहे. पण ते एका पक्षाचे खासदार देखील आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची आयडोलॉजी घेऊन चालायला हवं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी दिली.