मोदी सरकार विष्णूचे नाही, आपल्या दुर्दैवाचे दशावतार! – जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | गेल्या आठवड्यात जालंदरमध्ये झालेल्या भारतीय विज्ञान परिषदेत आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव यांनी केलेल्या भाषणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टिका केली आहे. मोदी सरकार विष्णूचे नाही, आपल्या दुर्दैवाचे दशावतार आहेत असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आपल्या फेसबुक अकॉउंट वरुन याबाबत सविस्तरपणे या घटनेचा व पूर्वी झालेल्या काही विधानांचा आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. “गेली चार वर्षे भारतीय विज्ञान परिषद गाजते आहे, ती कुठला नवा सिद्धांत, प्रमेय किंवा संशोधन साहित्य मांडलं गेल्यामुळे नाही, तर स्वतःला वैज्ञानिक किंवा शिक्षणतज्ञ म्हणवून घेणाऱ्या, सुटाबुटात वावरणाऱ्या भोंदू लोकांच्या भंपक विधानांमुळे. विद्यमान सरकारमध्ये खच्चून भरलेले साधू, महंत, योगी यांच्यासोबत तथाकथित सुशिक्षित उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, या सर्वांच्या आशीर्वादाने हे विष्णूचे नाहीत, तर आपल्या समाजाच्या दुर्दैवाचे दशावतार चालू आहेत. “

Leave a Comment