हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे अस ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी माझ्यावर केलेल्या अत्याचारा विरोधात मी लढणार असेही त्यांनी म्हंटल आहे. ठाणे येथील मॉल मधील मारहाण प्रकरणी नुकतंच आव्हाड याना जामीन मंजूर झाला आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ????३५४ … मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत अस ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
विवियाना मॉलमधील (Thane News) मारहाण प्रकरणी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता.
रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीलाला स्पर्ष करत बाजूला होण्यास सांगितले असा दावा करत या महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधत तक्रार दाखल केली, याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.