तुम्ही चुलत्याच्या मरणाची वाट पाहताय, जनता औकात दाखवेल…; आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Awhad and ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील सभेत बोलताना, “ही शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत तुम्हाला भावनिक आवाहन करण्यात येईल, पण याला तुम्ही बळी पडू नका” असे वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अजित पवारांनी आज हद्दच ओलांडली आहे. चुलत्याच्या मरणाची वाट बघतोय. तुम्ही शरद पवार कधी मरतील याची वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल” असा घणाघाती प्रहार आव्हाडांनी केला आहे.

अजित पवारांवर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “तुम्ही एखाद्या माणसाच्या मृत्यूची इच्छा करणे कितपत योग्य आहे. तुम्ही तर काकाच्या मृत्यूची वाट पाहताय. शरद पवार कायम अजरामर असतील. त्यांचे योग्यदान पण अजरामर असेल. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट पाहताय, तुम्ही आज हद्द ओलांडली आहे. काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल”

त्याचबरोबर, “सत्ता गेली तरी चालेल पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारच असे म्हणणारे शरद पवार, महिलांना आरक्षण देणारे शरद पवार, त्यांच्या घोषणा आणि पॉलिसी ऐका, लातूरला भूकंप झाला, दीड महिना तिथेच राहिले आणि घर उभारली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही” असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर, “शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. तुम्हाला राज्यातही कोणी ओळखत नाही. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे.आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वी पासून बघितले आहे. आता तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते” अशी तिखट टीका अजित पवारांवर आव्हाडांनी केली आहे.