बाबा माझा चेहरा शेवटचा बघून घ्या असे म्हणत मॉडेलचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचला, मात्र…

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जोधपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बहुमजली हॉटेलच्या इमारतीतून तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव गुनगुन उपाध्याय असे आहे. गुनगुन उपाध्याय हि एक मॉडेल आहे. गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुनगुनने आत्महत्या करण्याअगोदर फक्त माझा चेहरा पहा, असे वडिलांना सांगितले होते. मात्र तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झाले नाही. जोधपूर शहरातील रातानाडा भागामध्ये हि घटना घडली आहे. गुनगुन ही थान भागात राहणाऱ्या व्यापारी गणेश उपाध्याय यांची मुलगी आहे. रविवारी रात्री ती हॉटेल लॉर्ड्समध्ये थांबली असताना हि धक्कदायक घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?
गुनगुन उपाध्याय हि एक मॉडेल आहे. ती शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिने वडिलांना फोन करुन आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावेळी तिने फक्त माझा चेहरा पहा, असे तिने आपल्या वडिलांना सांगितले. यानंतर गुनगुनचे वडील गणेश उपाध्याय यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी
गणेश उपाध्याय यांच्या सांगण्यावरून एसीपी देरावर सिंह यांनी फोन नंबरच्या आधारे गुनगुनचे लोकेशन शोधून काढले.यानंतर पोलीस रातानाडा परिसरातील हॉटेलवर पोहोचले पण त्यागोदरच गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली होती. तिला उपचारांसाठी तातडीने मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मॉडेल गुनगुनची प्रकृती गंभीर
गुनगुनच्या छातीसोबतच तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गुनगुन उंचावरुन खाली पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे अशी माहिती गुनगुनवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. गुनगुनचे वडील जोधपूरमधील बाजारात व्यापारी आहेत. गुनगुन शुद्धीवर आल्यानंतरच तिने टोकाचे पाऊल का उचलले हे समजणार आहे.