हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Johnny Depp : हॉलिवूड स्टार जॉनी डेप सध्या खूपच चर्चेत आहे. आपली माजी पत्नी असलेल्या अंबर हर्डसोबतच्या खटल्यामुळे तर तो आणखीनच चर्चेत आला आहे. हे लक्षात घ्या कि, जॉनी डेपने काही दिवसांपूर्वीच अंबर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता, ज्याचा निकाल या अभिनेत्याच्या बाजूने लागला. हा खटला जिंकल्यानंतर जॉनीने आता आपल्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. याच दरम्यान, जॉनी डेपने आपल्या मित्रांसह बर्मिंगहॅममधील एका भारतीय रेस्टॉरंटला भेट दिली जिथे त्याने भारतीय पदार्थांवर चांगलाच ताव मारला.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्याने बर्मिंघम मध्ये असलेल्या ‘वाराणसी’ नावाच्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये भारतीय जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. या वेळी डेपसोबत संगीतकार जेफ बेकही तिथे हजर होता. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘वाराणसी’ रेस्टॉरंटने Johnny Depp चे काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्यासोबत जेफ बेकही असल्याचे दिसून येत आहे.
या शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये Johnny Depp ‘वाराणसी’ रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांसोबतही पोझ देताना दिसून येत आहे. यावेळी, त्याने ऑफ-व्हाइट शर्टवर हाफ जॅकेट आणि निळा डेनिम जॅकेट घातले होते. त्यासोबतच त्याने हॅट आणि काळ्या रंगाचे शूज देखील घातले होते. जॉनी डेपचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. तर दुसरीकडे, जेफ बेकने पांढरा टी-शर्ट, निळा डेनिम आणि तपकिरी रंगाचे जॅकेट घातलेले दिसून येत आहे.
हे जाणून घ्या की, बर्मिंगहॅममधील हे वाराणसी रेस्टॉरंट मोहम्मद हुसैन नावाचे व्यक्ती चालवतात. हुसेन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत या अभिनेत्याने खाल्लेल्या डिशेसबाबतचा देखील खुलासा केला आहे. हुसेनने यावेळी सांगितले केला की, Johnny Deppने यावेळी आपल्या 20 मित्रांसोबत जेवण केले. त्यांनी चिकन टिक्का, तंदूरी वाइल्ड किंग प्रॉन, बटर चिकन अशा पदार्थांचा आस्वाद घेतला. मात्र, हुसैन यांनी अभिनेत्याने किती बिल भरले याबाबतची माहिती उघड केलेली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार यावेळी अभिनेत्याने 48 लाखांचे बिल भरल्याचे सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा :
राशी खन्ना चा किलर लूक ; पाहा…
श्रेया धन्वंतरी चा बिकिनी मध्ये हटके अंदाज.
चित्रांगदा सिंहचा ग्लॅमरस लूक चर्चेत.
नयनतारा अडकली विवाह बंधनात पाहा फोटोज्.