बाब्बो!! क्रेडिट कार्डवर खरेदी केली गगनचुंबी इमारत; कोण आहे हा पठ्ठ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रेडिट कार्ड (Credit Card) तर तुम्हाला माहिती असेलच.. क्रेडिट कार्डवर आपण भरपूर खरेदी करत असतो. शॉपिंग करणे, नवनवीन वस्तू खरेदी करणे, लाईट बिल किंवा अन्य कोणतेही बिल भरणे या सर्व गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शक्य होतात. मात्र तुम्ही असं कधी ऐकलं आहे का, कि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चक्क एक गगनचुंबी इमारतच खरेदी करण्यात आली. होय हे खरं आहे. कॅनडामधील अब्जाधीश जोनाथन बॅनर (Jonathan Wener) यांनी हि करामत केली आहे. फोकस यूट्यूब चॅनेलला फायनान्सवरील बिग शॉटला दिलेल्या मुलाखतीत जोनाथन बॅनर यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर आकडेवारीनुसार सांगायचं झाल्यास, जगभरात क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर कॅनडा मधील लोक करत आहेत. कॅनडाच्या एकूण लोकसंख्येनुसार जवळपास 82.74 टक्के लोक क्रेडिट कार्ड वापरतात. यावर बोलत असतानाच जोनाथन बॅनर यांनी मी तर क्रेडिट कार्डवर इमारतच खरेदी केल्याचे सांगून टाकलं. जेव्हा बॅनरला रॉयल ट्रस्ट क्रेडिट कार्ड कंपनीची इमारत 6.5 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने रॉयल ट्रस्टचे गोल्ड क्रेडिट कार्ड वापरून पैसे दिले. जोनाथन याना या क्रेडिट कार्ड व्यवहारावर 2 टक्के फायदा झाला. जोनाथन बॅनरने सांगितलं कि, ते जे क्रेडिट कार्ड वापरतात ते खरेदीवर 1 टक्के सूट देते तसेच क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी त्यांना एक महिन्याचा अवधी मिळत असे.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड हे एक आर्थिक साधन आहे जे तुम्हाला तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर क्रेडिट मिळवू देते. सोप्या भाषेत, क्रेडिट कार्ड हे एक कर्ज साधन आहे जे तुम्हाला आत्ताच वस्तू खरेदी करण्यास आणि नंतर पैसे देण्याची परवानगी देते. 2023 मध्ये वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, कॅनडामधील बहुतेक लोक जगात क्रेडिट कार्ड वापरतात. इस्त्राईल, आइसलँड, हाँगकाँग, जपान, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, नॉर्वे युनायटेड स्टेट्स (यूएसए) आणि फिनलँड यासारख्या देशांमध्ये क्रेडिट कार्ड वापरले जातात.