हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने ‘मिशन 144’ ची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्यात संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची नावेच टाकण्यात आलेली नाहीत. भाजपच्या ‘मिशन 144’ मधून मुंडे बहिणींना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपच्या बढया नेत्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मुंढे बहिणींना देण्यात आले नसल्याने भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आजपासून सुरु होत असलेल्या भाजपच्या ‘मिशन 144’ साठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा औरंगाबादमध्ये येत आहे. औरंगाबादमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होणार आहे.
पंकजा मुंढे या राष्ट्रीय सचिव पदावर आहेत. मात्र त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेले नाही. औरंगाबाद लोकसभेच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे प्रत्येक वेळी सभा घेतात. आता त्यांचे नाव पत्रिकेवर नसल्याने त्या सभेला उपस्थित राहणार की नाही हा सस्पेन्स निर्माण झाला आहे.