“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं”, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे असे ते म्हणाले.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?
“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करायला हवं. दीपक केसरकरांनी जे विधान केलं आहे, त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाले असं दिसतं आहे. अब्दुल सत्तार यांनीही म्हटलंय की माझ्या गटातले लोकं माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. त्यांच्या गटात काय वाद सुरू आहेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

तसेच हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, हा गटही टीकणार नाही. यापैकी बरेच लोकं भाजपात प्रवेश करतील. तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना आता शिवसेना स्वीकारणार नाही, असेदेखील संजय राऊत यावेळी म्हणाले. “दीपक केसरकर यांनी एकत्र येण्याची केलेली भाषा हे त्यांच्या गटातील वैफल्य आहे. मी फ्रेब्रुवारीमध्ये सरकार पडेल, असे बोललो होतो. त्यामुळेच केसरकर आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत. लवकरच 16 आमदार अपात्र ठरतील. आमची कायदेशीर बाजू भक्कम आहे”, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?