रतन टाटा यांचे निकटवर्तीय आर. के. कृष्णकुमार यांचं निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – रतन टाटा यांचे निकटवर्तीय आणि टाटा समूहाचे दिग्गज आर. के. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांचे रविवारी संध्याकाळी मुंबईत निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांनी टाटा समूहात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते इंडियन हॉटेल्सचे प्रमुखही होते. ते 84 वर्षांचे होते. कृष्णकुमार यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कृष्णकुमार यांच्या जाण्यानं जे दुःख झालंय, त्याचं वर्णन शब्दांत करणं कठीण : रतन टाटा
आपला मित्र आणि सहकाऱ्याच्या निधनाने रतन टाटा यांना दुःख झाले असून त्यांनी यावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या सहकाऱ्याच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटा म्हणाले की, “माझे मित्र आणि सहकारी आर. के. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांच्या निधनानं मला जे दुःख झालंय, त्याचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे. टाटा समूहात आणि वैयक्तिकरित्या काम करताना आम्ही जे सौहार्दपूर्ण संबंध जपले होते, ते कायम स्मरणात राहतील.”

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील कृष्णकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले कि, थलासेरीमध्ये जन्मलेल्या कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांनी दक्षिणेकडील राज्यांशी टाटा समूहाचे संबंध मजबूत करण्यात मदत केली, असं म्हणत पिनराई विजयन यांनी आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, कृष्णकुमार निवृत्तीनंतरही टाटा ट्रस्टमध्ये कार्यरत होते.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..