Mumbai News : मुंबईतील काळाचौकी परिसरात 8 सिलेंडरचा स्फोट; झोपडपट्टीला भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून आगीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज सकासकाळीच मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या पाठीमागील बाजूला असलेल्या साईबाबा झोपडपट्टीत आग लागली आहे. सिलेंडरचे आठ स्फोट झाल्याने (Kalachowki area blast) ही आग लागली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. लवकरच ही आग वीजवण्यात येईल.

या संपूर्ण परिसरात सुमारे २ हजार नागरिक राहतात. येथे लोकसंख्येची घनता जास्त असून दाटीवाटीत नागरिक राहत असल्याने आगीतून बचावासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. ८ सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाबा पाथ स्कूल या शाळेमध्ये स्फोट झाल्याचे समोर येत आहे. शाळेत एक लग्नकार्याचा हॉल आहे, तिथं कैटरींगचा व्यवसाय चालतो. सिंलेडर त्यासाठीच तिथं ठेवल्याची शक्यता आहे.

सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नाही. मुंबई पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोचले असून बचावकार्य सुरु झालं आहे. लवकरच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल. मात्र बंद शाळेतील सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.