कौतुकास्पद! पूराचे पाणी ओसरल्यावर मुस्लिम बांधवांनी काढला महादेव मंदिरात साचलेला गाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, जावळी, वाई तालुक्यात दरडी, मातीचे ढिगारे कोसळले आहेत. तसेच बंधारे, तळाप फुटून नदीनाही महापूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात मंदिर, घरे यांचे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यातील काले येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात दुर्गंधी व घाणीचे सामाज्य पसरले होते. त्याची आज काले येथील मुस्लीम बांधवांकडून साफ-सफाई करण्यात आली.

मुसळधार पावसाचा फटका कराड तालुक्यातील सर्वच गावांना बसला. प्रामुख्याने उंडाळे भागात मोठ्या प्रमाणात दक्षिण मांड नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले. त्यामुळे मंदिर, घरे, जनावरांची गोठे अशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा संकटाच्या काळात सापडलेल्या नागरिकांचे गावातील युवक, नागरिकांनी एकत्रित येत मदत करीत पुनर्वसन केले. तर सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून पुढाकार घेत मुस्लिम समाजातील बांधवांनी गावात असलेल्या महादेव मंदिराचे साफसफाईही केली. त्यांच्या या कार्यात सहभागी होत गावातील नागरिक सुर्यकांत देशमाने यांनी अल्पोपहाराची सोय केली.

कराड तालुक्यातील काले या गावात तब्बल पस्तीस ते चाळीस वर्षानंतर महापुराची स्थिती निर्माण झाली होती. काले गावातील बाजारपेठ या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी दक्षिण मांड नदीतून पाणी थेट शिरले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात अशा प्रकारचा पाऊस आणि अशा प्रकारच्या पाण्याचा प्रवाह हा बघण्यात आलेला नव्हता.

Leave a Comment