प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो; कंगणाकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायम चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रभू रामचंद्रांप्रमाणे एका योगी आदित्यनाथ यांचे राज्य असेच सुरू राहो, साम्राज्य वाढो, अशा शब्दांत तिने योगीना शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगना म्हणाली, योगीजी सरळमार्गी आणि खरे आहेत. योगीजी नेहमीच प्रेरणा देत असतात. इतक्या कमी वयात देशाला लाडका नेता मिळणे म्हणजे भाग्यच आहे, . प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत आणि योगीजींचे साम्राज्य वाढो हीच सदिच्छा.

योगी यांच्या कडून कंगनाला खास गिफ्ट

भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं त्यांनी कंगनाला दिलं आहे. कंगनानं आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचं देखील कंगना म्हणाली आहे.

You might also like