कंगनाची रडत रडत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; Twitter अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर फेसबुकवर एक्टीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे नुकतेच ट्विटर अकाऊंट नियमोल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मात्र धाकड गर्लने कोणालाही न जुमानता आपल्या प्रश्नांना वाट मोकळी केली आहे. आता तिचा मोर्चा थेट फेसबुककडे वळला आहे. मात्र यावेळी खडे सवाल विचारताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले आहेत. बंगालमधील हिंसादायक दृश्ये पाहून तिचे मन गहिवरल्याने तिने हिंदूंचे रक्त फार स्वस्त आहे का अशी विचारणा केली आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्यानंतर तिचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले. मात्र पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या हिंसाचाराचे दृश्य हे मन हेलावणारे आहे. याच संदर्भात तिने व्यक्त होतानाचा एक व्हिडीओ फेसबुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने स्वतः हे सारे दृश्य पाहून डिस्टर्ब झाल्याचे सांगितले आहे.

https://www.facebook.com/KanganaRanaut/posts/318326012973268

पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर खुलेआम होणारे खून, गँगरेप, घरांची जाळपोळ यांचे व्हिडीओ आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. यांबाबत बोलताना कंगनाने हिंदूंचे रक्त इतके स्वस्त आहे का ? तसेच हि कोणत्या पद्धतीची कॉन्स्पिरसी अर्थातच षडयंत्र चालू आहे अशी देखील विचारणा केली आहे. तर यांसारखे देशद्रोही देश चालवणार का असा खडा सवाल देखील उपस्थित केला आहे.

Leave a Comment